शेतक-यांना दिलासा बेदाण्याला मिळाला सर्वाधिक प्रती किलो 261 रुपयांचा दर

 



 पंढरपूर प्रतिनिधी :- अनलॉक जाहीर झाल्यानंतर पंढरपूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा,केळीसह इतर शेती मालाच्या खरेदी विक्रीला गती आली असून गौरी गणपती सणाच्या काळात येथील बेदाणा सौदे बाजारात बेदाण्याची चांगली आवक झाली. यामध्ये प्रती किलो 261 रुपयांचा उच्चांकी तर सरासरी 150 रुपये दर मिळाल्याची माहिती पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप (आप्पा) घाडगे यांनी दिली आहे. 


 पंढरपूर येथील बेदाणा सौद्यामध्ये बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला मोठी मागणी झाली. बाजारात उच्च प्रतीच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रती किलो 261 रुपयांचा दर मिळाला आहे. 


 लॉकडाऊन कालावधी नंतर शेतकऱ्यांना हा सर्वाधिक दर मिळाल्याचे सांगण्यात आले. गेले दोन दिवसांपूर्वी बेदाणा सौदे बाजारात 15 ट्रक बेदाण्याची आवक झाली होती व सर्व बेदाण्याची विक्री झाली. 


चांगल्या बेदाण्याला 261रुपयांचा तर कमी प्रतीच्या बेदाण्याला 50 रुपयांच्या पुढे दर मिळाला आहे. पंढरपूर येथील बेदाणा बाजारात सरासरी प्रती किलो 150 रुपयांचा दर मिळाला आहे  राज्यासह शेजारील कर्नाटक,आंद्रप्रदेश राज्यातून शेतकरी बेदाणा विक्रीसाठी घेवून  पंढरपूर येथे येतात विक्री झालेल्या बेदाण्याला रोख स्वरुपात वेळेवर पैसे दिले जातात. चोख व्यवहार आणि पारदर्शी सौदे बाजारामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणे बाजाराची उलाढाल वाढल्याचे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले. 


बेदाण्याची आवक वाढली 

येथील बेदाणा सौदेबाजारात बेदाण्याची आवक चांगली वाढली आहे. अनलॉक नंतर बेदाण्याच्या खरेदी विक्री व्यवहारांना गती आली आहे. येथे झालेल्या सौदे बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 261 रुपयांचा उच्चांकी तर चांगल्या बेदाण्याला सरासरी 150 रुपयांचा दर मिळाला आहे. 

- सोमनाथ डोंबे, बेदाणा व्यापारी, पंढरपूर

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget