पंढरपूर // प्रतिनिधी
प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. ८ दिवसात मंदिर उघडण्याबाबत नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं आश्वासन मिळालं आहे. पण १० दिवसात मंदिर उघडी नाही झाली तर पुन्हा पंढरपुरात येऊ अशा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, 'मुंबईतले अधिकारी संपर्कात होते. त्यांचं एकच तुणतुणं सुरु होतं. धार्मिकस्थळ उघडली तर कोरोना पसरेल. मी त्यांना म्हटलं की, सकाळी लवकर उठा आणि बाजारात फिरा. जेथे कुठलाही फिजिकल डिस्टंसिंग पाळलं जात नाही. येथे कोणाला कोरोना झाला का? हे सांगावं. लॉकडाऊनमुळे देशभरात ८५ लाख लोकं शहर सोडून गावात गेले. शेकडो किलोमीटर चालत गेले. ज्या ज्या गावातून हे लोकं गेली, तेथे लोकांनी त्याला मदत केली.
मंदिर खुलं झालं आहे असं समजा. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात जाऊ शकतो, काही प्रमाणात नाही करू शकत. दहा दिवसाचा इशारा दिला आहे. रस्त्यावर उतरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर लढणारी माणसं आहोत.पंढरपूर प्रशासनाचे हार्दिक आभार. आंदोलन या ठिकाणी थांबवतो आहे. शासनाने जर दहा दिवसांत ऐकलं नाहीतर आम्ही पुन्हा याठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.