पुणेकरांनो सावधान! मास्क न वापरणाऱ्यांसाठी अजित पवार घेणार मोठा निर्णय



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. अशात कोरोनाची लक्षण, रोजचे आकडे, समोर येणाऱ्या धक्कादायक घटना आणि लॉकडाऊनचे नियम यात रोज म्हटलं तरी बदल होतात. त्यामुळे नागरिकांमध्येही याबद्दल संभ्रम आहे. राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी पाहता नागरिकांनाही कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मास्क न वापरण्यावर अजित पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.


मास्क न वापरल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार रुपये दंड करण्याचा विचार अजित पवार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सध्या 28 हजार 142 एकूण कोरोना रुग्ण आहेत. तर, 872 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नुकत्याच एक सर्व्हेमधून पुण्यातील 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या 922 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा सर्व्हे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने करण्यात आला होता.


या सर्व्हेअंतर्गत पुण्यातील एकूण 2.46 लाख पुण्यातील तर 3500 पिंपरी चिंचवडमधील लोकांची तपासणी करण्याती आली. यात 922 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, ज्यांचे वय 60 आणि त्याहून अधिक होते. या सर्व्हेमुळे शहरातील अति धोकादायक, कमी धोकादायक अशा रुग्णांची विभागणी करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले.


पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, "आम्ही एक अॅप तयार केले आहे. ज्याचे नाव आहे वयश्री. यात अॅपमध्ये वयस्कर व्यक्तींची माहिती साठवली जात आहे.


याआधी प्रत्येक घराघरात जाऊन सर्व्हे करावा लागत होता. आता या अॅपच्या माध्यमातून सहज माहिती उपलब्ध होत आहे. सर्व्हेनंतर जास्त कोरोना रुग्ण असलेल्या परिसरांत नोडल ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले आहे", असे सांगितले. तर, पिंपरी चिंचवडमधीलही 2 लाख वयस्कर व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget