पंढरपूर // प्रतिनिधी
राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध व ई पास बंदी हटवण्याची मागणी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलव्दारे व व्हटसापव्दारे केली आहे.याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदनही पाठवले आहे. कोरोना विषाणून संसर्गजन्य रोग प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या त्याअंतर्गत प्रवासावरही बंदी घातलेली.मात्र या कालावधीत संपूर्ण अर्थचक्र थांबल्याने समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसलेला. आता परिस्थिती हळूहळू सावरत असताना केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पुर्वपदावर येण्यासाठी राज्यातंर्गत प्रवासावरील बंदी हटवण्याच्या सुचना दिलेल्या असूनही राज्य सरकारने यांची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही.राज्यातंर्गत प्रवास बंदी, ई पास या अटीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.अस संदिप मुटकुळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याअंतर्गत प्रवासावरील निर्बंध व ई पास बंदी ताबडतोब उठवावेत.ई पास पुर्णपणे बंद करावे.स्थानिक प्रशासनाला याबाबतीत दिलेले अधिकारी काढून घ्यावेत.असेही शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संदिप मुटकुळे म्हणाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.