वृत्तसंस्था प्रतिनिधी :- जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पांडुरंग पवार (वय ६७) यांचे आज सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले.
कोरोनाबाधित झाल्यावर त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली.
जिल्हा परिषदेतून सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार जुन्नर तालुका पंचायत समितीचे १९९२ ते १९९७ या सलग पाच वर्षात सभापती पद भूषविले त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार ही मिळाला. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन उपक्रम राबविला होता.त्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी घेऊन गावभेट दौरे करीत विविध गावांमधील प्रश्न सोडविण्यात मोलाचे योगदान होते.
दशरथ पवार यांचे मूळ गांव पारुंडे येथे दरवर्षी भरणाऱ्या कुंभमेळा समितीचे अध्यक्ष होते.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्याची कामगिरी उल्लेखनिय होती.ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे.क्रांती तरुण मंडळ, महाजन आळी मित्र मंडळ,त्रिमूर्ती मित्र मंडळ या मंडळांशी त्यांचे जवळीकतेचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने अवघ्या जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.