केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

रळमधील कोझिकोड एअरपोर्टवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात मृत्यू पावलेल्या दोन प्रवाशांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी झालेल्या या अपघातात दोन पायलटसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत दुबईहून कोझिकोड येथे येणारे विमान धावपट्टीवर कोसळले. यातील दोन प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 


विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधन यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान घटनास्थळी पोहोचले. 


या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. दुबईहून भारतात येत असलेल्या १९० प्रवाशांना घेऊन हे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी भरपूर पावसादरम्यान लँडिंग करत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं आणि ते ३५ फूट खाली कोसळलं. या अपघातात १८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. हे विमान खाली कोसळलं तेव्हा त्याचे दोन तुकडे झाले.  


या अपघातात मृत्यू झालेल्यां लोकांमध्ये पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार हेही आहेत. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget