वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं आहे. काँग्रेसचे संकटमोचक ते राष्ट्रपती आणि नंतर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न मिळवलेल्या प्रणव मुखर्जींची कारकीर्द उत्तुंग होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ राजकारणात आणि सत्तेत राहिलेले नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांचं नाव घेतलं जातं.
प्रणव मुखर्जींचा राजकीय प्रवास
१९६९ साली प्रणव मुखर्जी पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले. १९७३ साली त्यांना पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, तर १९८४ साली ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले. २००४ साली प्रणवदा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकले.
२०१९ साली प्रणव मुखर्जींना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २००८ साली त्यांना पद्म विभूषण, १९९७ साली सर्वश्रेष्ठ खासदार आणि १९८४ साली सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री असे पुरस्कार प्रणव मुखर्जींना मिळाले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.