वृत्तसंस्था // प्रतिनिधी
गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं विहार तलाव हे पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. मुंबईत 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री हा तलाव ओसंडून वाहत होता. यापूर्वी काही दिवस आधी म्हणजे 27 जुलै रोजी तुळशी तलावदेखील ओसंडून वाहत होता.
तुळशी तलावातूनदेखील मुंबईला पाणीपुरवठा होतो. विहार तलाव बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आहे. हा तलाव भरल्यामुळे मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकट टळलं आहे. 3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे.
यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलावही भरला होता. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 05 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी विहार तलाव ओसंडून वाहिला. गेल्या वर्षी 31 जुलै 2019 रोजी 27,698 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेले हे तलाव ओव्हरफ्लो झालं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.