दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून केला हल्ला, प्रकृती नाजूक



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा (Ompora) भागात दहशतवाद्यांनी (Terrorist) आज सकाळी भाजप (BJP) कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला. सध्या अब्दुल हमीद (Abdul Hamid Najar) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर तेथून पळ काढला. सध्या ओमपोरा परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्ते अब्दुल हमीद यांच्या घरावर हल्ला केला. अब्दुल हमीद यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच भागात उपस्थित असलेल्या भाजपच्या आणखी एका महिला कार्यकर्त्याच्या घरात घुसले. मात्र, भाजपच्या महिला कार्यकर्त्या त्यावेळी घरी उपस्थित नव्हत्या, त्यानंतर दहशतवादी तेथून पळ काढला.


अब्दुल हमीद हे बडगाम जिल्ह्यातील भाजपच्या ओबीसी युनिटचे जिल्हाध्यक्ष होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल केले. अब्दुल हमीद यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी या भागात घेराव घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.


दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागात दहशतवाद्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि सरपंच सज्जाद खांडे यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget