लाखोंचे आधारवड गेले!







पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील संत प्रवृत्तीचे लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांचे काल सोमवारी रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले . 

लाखोंचे आधारवड गेले! 

 

 पंढरपूरकरांनी आपल्या कुटुंब प्रमूख गमावला आहे अशा दु:खवेगामध्ये  प्रत्येकजण शोकाकूल आहे 

 कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत. 

त्यांच्या जाण्यापेक्षाही ते या पद्धतीने गेले .... त्यांचे अंत्यदर्शनही आम्ही घेऊ शकत नाही या भावनेने कार्यकर्ते व्याकुळ झाले आहे. 

काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते.

माजी आमदार, ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

परिचारक हे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. 2019 सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.

5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. यामध्येच त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवार पासून परिचारक अत्यवस्थ होते. अखेर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

परिचारक यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तरी अशा संकटप्रसंगी त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या एका फेसबुक पोस्ट द्वारे आवाहन केले आहे.

 त्यांच्यावरील पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आहेत , अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे .


 सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या  राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली  . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्यांना एकदाच  राज्यस्तरावरील सत्तेत बसण्याची संधी आली त्यातही त्यांनी हे महामंडळ नफ्यामध्ये आणून आपल्या निरपेक्ष कार्याची प्रचिती दिली होती . 

सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती .  अडचणीमध्ये - तोट्या मध्ये असलेले उद्योग फायद्यामध्ये आणून ते सभासदांचे आधारस्तंभ म्हणून  पुढे करण्याची त्यांची ख्याती होती.

 आज त्यांनी नव्याने उभे केलेले केलेला पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक ,  भीमा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले युटोपियन शुगर्स , कर्मयोगी विद्यानिकेतन , त्यांच्या सहकार्याने उभे राहिलेले दामाजी साखर कारखाना आणि तालुक्यातील 50 हून अधिक सोसायटी,  दूध संघांचे जाळे हे आज हजारो हजारो लोकांना रोजगार देत आहेत .

आपल्या कारकिर्दीत पाच वेळा आमदार किची टर्म भूषविणाऱ्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे दुखःद निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget