राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनाने निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचं निधन झालं आहे. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम सुरु करणारे जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने शोककळा पसरली आहे. दशरथ पवार हे नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचेही अध्यक्षही होते.


चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम तालुक्यात सुरु करणारे आणि त्यांच्या या उपक्रमाची दखल जिल्हा परिषदेने घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार यांचे आज कोरोना प्रादुर्भावामुळे उपचारा दरम्यान पुणे इथे निधन झालं. त्यांचे वय 67 वर्ष होतं.


मागील काही दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. दशरथ पवार यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारही होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे सन 1992 ते 1997 या सलग पाच वर्षांत सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता.


दशरथ पवार यांचे मूळ गाव पारुंडे. इथं भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. गावात एकोपा रहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असे.सर्वसामान्य कार्यकर्ता ते सभापती व प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरला आल्यानंतर नेहमी आमची भावकी कोठे आहे, असे म्हणत त्यांची आवर्जून चौकशी करत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पारुंडे व परिसरात शोककळा पसरली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget