पंढरपूर प्रतिनिधी :-मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील कै. कर्मवीर भीमराव महाडिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा सरस्वती विद्यालय व कर्मवीर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय येथे १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष व पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष श्री सुधीर (आबा) भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले
७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने औचित्य साधून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्री चागंदेव चव्हाण यांच्यावतीने रोख बक्षीसे कु. कुलकर्णी श्रध्दा रामकृष्णहरि. - प्रथम,कु. खरात प्राजक्ता तानाजी- द्वितीय, कू.तेरवे सानिका अरूण. - द्वितीय,कू. वाघमोडे वैभव विष्णूपंत - तृतीय यांना देण्यात आले आहे.
या कार्यक्रमास श्री सुधाकर चव्हाण ,श्री चांगदेव चव्हाण ,प्राचार्य यादव सर ,विद्यालयाचे माजी विद्यार्थी, पालक ,संकुलातील सर्व शिक्षक सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.