पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर आणि परिसरात येत्या 6 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून म्हणजे 7 तारखेच्या पहाटेपासून 13 च्या मध्यरात्री पर्यंत
लॉकडाऊन असणार आहे .अशी महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
या काळात संपूर्ण संचारबंदी असेल ,तसेच पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग आणि परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी होणार आहे . कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन मध्ये तीन दिवसापर्यंत वाढही होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुचित केले आहे.
केवळ दूध ,हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.