काँग्रेसच्या आंदोलनाचा पुरता फज्जा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोर स्टंटबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळ काढला






 वृत्तसंस्था // प्रतिनिधी

पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा विरोधकांनी धसका घेतला असून, विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. म्हणूनच आत्मनिर्भर पॅकेजबाबत बालिश सवाल उपस्थित करून आंदोलन करण्याचा आज केविलवाणा प्रयत्न झाला. पण भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या कार्यालयासमोर मोदी सरकारने दिलेल्या पॅकेजबाबत सविस्तर माहितीचा फलकच लावला. त्यामुळं आंदोलनाच्या नावाखाली स्टंटबाजी करायला आलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांचे अवसान गळाले. त्यातून कॉंग्रेसच्या आंदोलनाचा पूर्ण फज्जा उडाला. पालकमंत्र्यांनी पाठवलेल्या कार्यकर्त्याचा बार फुसका निघाला आणि अवघ्या 2 मिनिटात हे कार्यकर्ते गायब झाले. मुळात पोलीस किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता, केलेले आजचे आंदोलन म्हणजे, रडीचा डाव होता.

 संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोव्हीडचा हॉटस्पॉट बनला आहे.  वाढीव वीज बीलामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. त्याच वेळी जिल्हा परिषदेमधील खरेदी घोटाळा, मार्केट कमिटी मधील नोकरभरती घोटाळा, महापालिकेतील घरफाळा घोटाळा अशा  प्रश्‍नांवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. म्हणूनच या प्रश्‍नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी,  आंदोलनाचा फार्स करण्यात आला.

 निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे आणि धडाडीचे नेते, कामाचा अनुभव आणि मदत करण्याची इच्छा असणार्‍या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget