येणारी विधानसभा निवडणूक आम्ही वारकरी लढवणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वारकरी करून दाखवणार


सोलापूर // प्रतिनिधी 
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पण या संत भूमीमध्ये संत मंडळी वरच अत्याचार होताना दिसत आहेत पालघर सारखे प्रकरण महाराष्ट्रात घडावे हा कधी न पुसला जाणारा डाग महाराष्ट्राला लागलेला आहे सध्या परिस्थिती संतांनी भजन-कीर्तन केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, देशी दारूची दुकाने उघडली जातात पण मंदिर मात्र बंद राहतात, भारत देश कृषिप्रधान देश आहे आणि या देशातील महाराष्ट्रात शेतकऱ्यावर एवढे संकट शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे, वारकरी हा शेतकरी आहे त्याच्या शेत मालाला भाव नाही, दुग्ध व्यवसाय केला दुधाला भाव नाही, आईन वेळेवर युरिया खताचा तुटवडा दाखवला जातो, सरकार पेक्षा या महाराष्ट्रातील कीर्तनकार कोरोना संकटातून कसा बचाव करावा याकरिता भरपूर प्रचार करू शकला असता पण सरकारने किमान पन्नास भाविकांना किर्तन करायला सुद्धा बंदी आणली आहे खरं म्हणजे इतर ठिकाणी भरपूर गर्दी दिसून येत आहे पण सरकार मात्र वारकर्‍यांच्या विषयी उदासीन दिसत असून वारकरी चालीरिती परंपरा बंद पडण्याच्या बेतात दिसत आहे आणि वारकऱ्यांनी सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केल्यानंतर सरकार कोणत्याही प्रकारची वारकऱ्यांच्या सोबत चर्चाही करायला तयार नाही आम्ही वारकरी एवढे लाचार तर नाहीच पण शांततेच्या मार्गाने सरकारची चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर सरकार उदासीन दिसत आहे आणि म्हणून ज्या सत्तेची गुर्मी सरकारला आहे ही गुर्मी उतरवण्या करिता आम्ही वारकरी रणांगणात उतरणार आहोत .
    मुळात राजकारण आमचा विषय मुळीच नाही पण इतिहास आम्हाला सांगतोय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ हा राजश्रीत होता छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये बसायचे दुष्काळ पडला तर तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी  करोडो रुपयांचा नजराणा पाठवला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो नजराना स्वीकारला नाही तो भाग वेगळा पण आताच्या सरकारने या दुष्काळात वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीचा हात दिला नाही
    या महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 80% वारकरी संप्रदाय आहे आणि आमच्या सर्व वारकरी संघटनेचे पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात अतिशय विद्वान पदाधिकारी आहे आणि सध्यास्थितीत महाराष्ट्रातील जनतेचा फक्त संतमंडळी वरच  विश्वास आहे 
   आमचे ऐक ऐक कीर्तनकार लाखो लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना संघटन किती मजबूत आहे याची जाणीव पूर्ण महाराष्ट्राला आहेच
     आणि म्हणून या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारची झोप उडवीन्या करिता  करता आम्ही येणाऱ्या निवडणुकी मध्ये महाराष्ट्रभर आमदारकी करिता कीर्तनकार महाराज मंडळींना ऊभे करणार आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक वारकरी करून दाखवणार
या आधी कीतीतरी महाराज मंडळी ज्यावेळी आमदार ,खासदार की करता उभे राहिले आणि भरपूर मतांनी निवडून आलेले आहे याची जाणीव सर्व राजकीय नेत्यांना आहेच पण वारकऱ्यांचा स्वतंत्र पक्ष नव्हता आता मात्र आम्ही आमच्या विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून इतर सर्व संघटना एकत्र करून सर्व वारकरी संघटनेचे पदाधिकारी मैदानात उतरणार
   जर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतात, जर झाडूवाले केजरीवाल साहेब दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात, जर चहा विकता विकता श्री नरेंद्र मोदी साहेब या भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, जर अपंगाची सेवा करून शेतकऱ्यांच्या करिता कामे करून श्री बच्चुभाऊ कडू कितीतरी वेळेला अपक्ष निवडून येऊ शकतात तर सर्वगुणसंपन्न असणारा आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या विषयावर जनजागृती, गोहत्या बंदी, आपल्या मुला मुलींवर कसे संस्कार टाकवे, लव जिहाद आणि पारमार्थिक धडे देणारा  माझा वारकरी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का बर होनार नाही
   खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जर कोनी न्याय देईल तर तो फक्त संत समाजच देऊ शकतो कारण की संतांच्या जवळ कुणाचाही भिड भाड नाही (नाही भिड भाड तुका म्हने साना थोर)
    आणि जिथे साधू मुख्यमंत्री होतो त्या राज्यांमध्ये काय कायापालट होऊ शकतो त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आहे
    ही बातमी मी प्रकाश केली म्हणून कोणी असाही भ्रम करू नये गणेश महाराज शेटे यांना राजकारणात उतरायचे आहे मला तीन आपत्य असल्यामुळे मला उमेव्दारी करता उभे राहता येतच नाही पण माझे घराणे पारमार्थिक व राजकीय वलतील असल्यामुळे भरपूर अनुभव पाठीशी आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर उमेदवार उभे करण्याचे नियोजन मात्र निश्चित करता येते 
    म्हणून सरकारने आताही वारकऱ्यांच्या विषय गांभीर्याने विचार करून त्वरित भजन किर्तनाला परवानगी न दिल्यास सरकारचा पायउतार कसा करावा याकरिता पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारकरी बनवून दाखवनार

विश्व वारकरी सेना भारत

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget