वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.