दारूची दुकानं उघडताना जो उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा- देवेंद्र फडणवीस



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मंदिरं खुली करावी या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. यावर सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दारूची दुकानं उघडताना जो उत्साह दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा, असं म्हटलंय.


कोरोनाबाबत आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असं अजून घडलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल. आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं आहे, असं फडणवीस म्हणाले.


कोरोनाच्या आपत्तीबाबत सरकार आणि मंत्री गंभीर नाहीत. कोरोनाबाबतची जबाबदारी फक्त प्रशासनाची नव्हे तर शासनाची असते. राज्यसरकार म्हणावं तितकं प्रशासनाला सहकार्य करत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget