मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे : माजी खासदार राजु शेट्टी



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून राज्यात काय चालले आहे ते बघावे. अलिबाबा चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वच पक्षसहभागी आहे. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.


  माजी खासदर राजू शेट्टी यांनी गुरुवारी (दि. २७) बारामती शहरात दुधदरासाठी जनावरांसह आंदोलन केले. शारदा प्रांगण येथून ढोलताशाच्या गजरात जनावरांना घेऊन मोर्चाला सुरवात करण्यात आली. आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. इंदापूर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली मार्गे प्रशासनभवन येथे पोलिसांनी मोर्चा अडवला.यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षनेत्यांना खडे बोल सुनावले . यावेळी सरकारी खरेदी होऊन देखील दुधाचे भाव वाढत नसल्याने ही दूध उत्पादकांची फसवणूकच आहे, असा आरोप करत त्यांनी दूध संघांनी दिलेल्या भावाची आकडेवारी वाचूनदाखवली. सरकारने दुध संघांना  २५ रुपये प्रतिलीटर दर दिला,मात्र,शेतकऱ्यांना १७ रुपये दर मिळाला. हे सगळे जर मुख्यमंत्री बघत असतील तर शेतकऱ्यांना हातात लोढणे का घेऊ नये असा संतप्त सवाल शेट्टी यांनी यावेळी केला.


 कोल्डड्रिंकसाठी १५० रुपये लिटर दर मिळतो.गोमूत्र आणि शेणाला दुधापेक्षा अधिक दर मिळतो. पाण्याची बाटली दुधापेक्षा महाग आहे. ही बाबराज्यकर्त्यांना शरम वाटावी, अशी आहे. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावानेदरोडेखोरी करीत आहेत.दुध उत्पादनाचा खर्च प्रतिलीटर ३२ रुपये आहे.शेतकऱ्यांच्या हाती १७ रुपये मिळतात.जनावरांसाठी पशुखाद्य,वैद्यकीय उपचार,चाऱ्यासाठी शेतकरी पैसे आणणार कोठुन.राज्यकर्त्यांनी याचा विचारकरण्याची गरज आहे.हे धोरण न बदलल्यास जनावरे राज्यकर्त्यांच्या दारातनेवुन बांधण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी ५रुपयांचे अनुदान हे दूध उत्पादकांचा हक्क आहे. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही येऊन घामाचा दाम माग आहेत. वेळ पडल्यास जहाल आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी वेळपडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. दशरथ राऊत यांनी देखील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget