अजित पवारांचा एकेरी उल्लेख; पोलिसांची धरपकड तर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

'अरे इथून मागे तू गुरं वळत होतास ना. आम्ही पण गुरच वळतोय...बोलण्याची काही अक्कल आहे का तुला. अर्थमंत्री आहेस ना?...पाठीमागं मावळत सहा-सात मारलीस तू. इथं पण तुला मावळ करण्याचा आहे काय', असा घणाघात करत भामा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं. त्यांच एकेरी उल्लेख करत समाचार घेतला.


पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिणीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला.


मागील 30 वर्षांपासून सुरू असलेली भामा-आसखेड धरणग्रस्तांची परवड अद्यापही थांबलेली नाही आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, असा कोर्टाचा निर्णय असताना सरकार आणि अधिकारी मात्र आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.


पालकमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं अखेर सोमवारी भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. जलवाहिणीची सुरू असलेले काम बंद करावे आणि मग शेतकऱ्यांसमवेत मिटिंग करावी, असा सूर लावला. भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे जलवाहिनीचे काम आजही काही वेळ बंद पाडलं.


"आम्हाला अटक करा, नाहीतर काम बंद करा" अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी यावेळी मांडली होती. परंतु आम्हाला काम बंद करण्याचा अधिकार नसल्यानं आम्ही काम बंद करू शकत नाही, अशी भूमिका चाकण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी घेतली. त्यामुळे आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. शेवटी चिडलेल्या आंदोलकांनी प्रशासन सरकार विरोधात भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget