सोलापूर // प्रतिनिधी
महाळुंग ता.माळशिरस येथील श्री राम भक्तांनी आणि गावातील नागरिकांनी श्रीराम मंदिरात येऊन फिजीकल डिस्टनचे, काटेकोर पालन करून आनंद उत्सव साजरा केला.
मंदिरा समोरील भव्य पटांगणामध्ये नागरिक, महिला यांनी ठराविक अंतर राखून आयोध्या मध्ये श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले याच मुहूर्तावरती महाळुंग मध्ये श्रीराम मंदिरात पूजा करण्यात आली. यावेळी फटाक्यांची, तोफांची आतिशबाजी करण्यात आली. लोकवर्गणीतून 9000 लाडूंचे यमाईदेवी मंदिरा भोवतालच्या माकडांना, तसेच महाळुंग श्रीपुर परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भजनी मंडळाचे सदस्य, महाळुंग ग्रामपंचायतीचे सदस्य, अधिकारी, गावातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक श्री राम मंदिरात ठराविक वेळेचे अंतर ठेवून दर्शन घेण्यासाठी येत होते. यावेळी सर्वांना लाडूचा महाप्रसाद देण्यात आला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.