पंढरपूर // प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.कारण वसंतराव नाईक यांनी १९६३ते१९७५च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते.ते महान नेते होते.गोरगरीबांना रोजगार उपलब्ध व्हावा.ते म्हणून राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्याचा क्रांतीकारी निर्णय अंमलात आणला.तसेच देशात राबिण्यात येणा-या मनरेगा सारख्या महत्वपुर्ण योजना राबिण्यामागे त्यांची मोठी कामगिरी होती.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांधिक काळ राज्यभर सांभाळला,सतत अकरा वर्ष महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पद भुषविले ते पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भुषविले,त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून मध्यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले.सन १९५१साली ते मध्यप्रदेश सरकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक, विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्यपदी तसेच १९५६भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्यांनी उपमंत्रीपदाची व महसूल खात्याची जबाबदारी अत्यंत हुशारीने पार पाडली.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे भारताचे पहिले संरक्षणमंत्री झाले.त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे सुत्र दादासाहेब कन्नमवार यांच्या हाती आले.परंतु एक वर्षानंतर १९६३साली दादासाहेब कन्नमवार निधन झाल्यामुळे वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती.त्यामुळे त्यांना देशातील सर्वाच नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पंढरपूर उपविभागीय अधिकारी साहेब सचिन ढोले,पंढरपूर तहसीलदार मॅडम वैशाली वाघमारे, यांच्याकडे मेलव्दारे व व्हटसापव्दारे केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.