सोलापूर // प्रतिनिधी
झी टॉकीज मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाच्या शूटिंग करिता शंभर वारकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे पण प्रश्न आहे झी टॉकीज शुटींग करिता 100 श्रोत्यांना परवानगी आहे तर मग गावांमध्ये परंपरेने चालत आलेले सप्ताह करण्याकरिता शंभर भाविकांना रीतसर परवानगी सरकारने का देऊ नये 100 भाविकांना धार्मिक कार्यक्रम करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली आहे पण राज्य सरकारचे असे कोणतेही रितसर पत्र न मिळाल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे निष्ठावान वारकऱ्यांचे कीर्तन करण्याकरता परवानगी नाही पण बऱ्याच दिवस आधी झी टॉकीज कीर्तनाच्या शूटिंगला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून सरकारने निष्ठावान वारकर्यांचा विचार करावा अन्यथा वारकरी सरकारला न जुमानता आपापल्या परीने कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.