उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखाना लिमिटेड युनिट क्रमांक 1 या कारखान्याच्या आठवा गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री ब्रिजलाल मोदाणी साहेब यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. विश्वास आप्पा शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शाडो कॅबिनेट मंत्री मा. श्री. दिलीप (बापू) धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे चोराखळीचे सरपंच मा.श्रीखंडेराव एकनाथ मैदाड व सौ अरुणाताई खंडेराव मैदाड. यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे हा कार्यक्रम धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर 1 कारखाना साईट चोराखळी येथे होणार असून या समारंभासाठी सर्व व सभासद संचालक व सर्व कामगार वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.श्री.अभिजीत धनंजय पाटील यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.