वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत उपसमितीचे अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा झाली आहे.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने अंतरीम आदेश रद्द करता येईल का? त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका करण्यात येईल का? दुसरा पर्याय सरकारकडे अध्यादेश काढण्यासंदर्भात आहे. जर तो अध्यादेश काढला तर सरकारला ते आरक्षण नोकरीत आणि शिक्षणात देतां येईल का? या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.