सोलापूरग्रामीण जिल्ह्यात 519 नवे कोरोना रुग्ण ; 10 मृत्यू, जाणून घ्या कोणत्या तालुक्यात किती रुग्ण



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे .आज सोमवारी दि.14 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 519 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 324 पुरुष तर 195 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 374 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 5 पुरुष तर 5 महिलांचा समावेश होतोय.


आज एकूण 2692 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2173अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 898 इतकी झाली आहे. यामध्ये 10,943 पुरुष तर 6915 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.


आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 504 जणांचा मृत्यू झाला आहे यात 349 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 41 आहे .


यामध्ये 3 हजार 843 पुरुष तर 2198 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 11 हजार 313 यामध्ये 6748 पुरुष तर 4556 महिलांचा समावेश होतो.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget