वृत्तसंस्था // प्रतिनिधी
माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनराव शिंदे यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावर 1 सप्टेंबर,2020 रोजी सकाळी 9 ते दु.4 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे युनिट नं.1 व युनिट नं.2 येथी अधिकारी व कर्मचारी ,सभासद शेतकरी व कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण 569 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मार्केट कमिटी संचालक प्रभाकर परबत व नागनाथ पाटील यांच्या यांचे शुभहस्ते व
कारखान्याचे संचालक व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत कै. आ.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनासाठी सोलापूर येथील गांधी फोरम या रक्तपेढीने उपस्थित राहून रक्त संकलन केले. यामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील कारखाना अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी उस्फुर्त सहभाग नोंदवून एकुण 569 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना या महामारीचे पार्श्वभुमीवर आ.बबनराव शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून माढा मतदारसंघामध्ये 30 हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना महामारीचे पार्श्वभुमीवर कोरोनाग्रस्त रूग्ण व इतर आजारावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगांव टे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांचेमाध्यमातून माहे जून मध्ये माढा मतदारसंघामध्ये ठिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून 2 हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आलेले होते. तसेच 30 सभासद शेतक-यांना हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलेले आहे.
सदरप्रसंगी कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, पिंपळनेर चे बिभिषण डांगे, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव, वर्क्स मॅनेजर सी.एस.भोगाडे, चिफ केमिस्ट पी.एस.येलपले, युनिट नं.2 चे चिफ इंजिनिअर एन.एच.नायकुडे,डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, युनिट नं.2 चे इनचार्ज चिफ केमिस्ट बी.जे.साळुंखे, ऊस पुरवठा अधिकारी एम.एम.चंदनकर, परचेस ऑफिसर जे.डी.देवडकर, मार्केटींग ऑफिसर एन.एम. नायकुडे, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर,गांधी फोरमचे मोहन वैदय, अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद शेतकरी उपस्थित होते.
मौजे रांझणी देवाची,ता.माढा येथील दत्तात्रय भैरू जाधव (फोटोग्राफर) यांनी माढा तालुक्याचे भाग्यविधाते आ.बबनराव शिंदे यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटाच्या रक्ताच्या तुटवडयामुळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 71 व्या वेळी रक्तदान केले. त्यांनी 20 वर्षापूर्वी 100 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केलेला असून पुढील काही वर्षात संकल्प पूर्ण करणेचा निर्धार त्यांनी केला आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.