खा. शरद पवारांनी घेतले आमदार प्रशांतराव परिचारक यांची भेट



(परिचारक वाड्यावर जाऊन केली सर्वांची विचारपूस)

कै.आ.सुधाकरपंतांनी शेतकरी आणि सामान्य माणसासाठीच अखेरच्या पर्यत झटले: खा.शरद पवार


पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर दिनांक 29 सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज कै आ सुधाकरपंत परिचारक यांच्या कुटुंबीयांचे त्याचबरोबर भोसे येथील कै राजु बापू पाटील आणि श्री संत कैकाडी बाबांचा पुतणे ह-भ-प रामदास महाराज यांचे काही दिवसांपूर्वी कोरोना मुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज पंढरपूर येथे आले असता खासदार शरद पवार यांनी परिचारक कुटुंबातील जेष्ठ प्रभाकर परिचारक यांचे सांत्वन केले

याप्रसंगी खासदार शरद पवार यांनी कै सुधाकरपंत परिचारक अतिशय काटकसरीने कारभार करत होते तसेच त्यांनी पहिल्यापासून सतत शेतकरी व सामान्य माणसांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य भरात आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले आहे असे म्हणत अनेक त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आमदार प्रशांतराव परिचारक यांना म्हणाले की आता त्यांच्या पश्चात मोठी जबाबदारी तुमच्यावर असून त्यांच्यासारखाच कारभार करा असा मोलाचा सल्लाही खासदार शरद पवार यांनी दिला यावेळी कै आ सुधाकरपंत परिचारक यांचे ज्येष्ठ बंधू प्रभाकर काका परिचारक यांचे सांत्वन केले यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक उमेश परिचारक प्रणव परिचारक हे होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget