सोलापूर // प्रतिनिधी
माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे गेल्या पन्नास वर्षापासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, कला क्रीड़ा क्षेत्रात तन, मन, धनाने तसेच सर्व समाज घटकांसाठी कार्य करणारे, तसेच केन्द्रामध्ये लोधी समाजाला obc समाविष्ठ करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रकाश यलगुलवार यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी सुचविण्याची मागणी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याकडे लोधी समाजाचे शिष्ठमंडळ लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, माजी अध्यक्ष हनुमानसिंग चौधरी, महाराष्ट्र प्रदेश लोधी समाज युवक अध्यक्ष परशुराम सतारेवाले, मुरब्बी रतनसिंग कैय्यावाले, मोहनसिंग मौलावाले, मानसिंग सतारेवाले, सुरेश पंतुवाले, भरतसिंग मदनावाले यांच्यासह इतर समाजबांधव यांनी केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.