मा.आ.यशवंत (तात्या) माने यांच्या प्रयत्नांना अवघ्या एका तासात यश..



१ कोटी,३७ लाखाहुन अधिकची भूसंपादन रक्कम केले तात्काळ मंजूर

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

माजी आमदार मा राजनजी पाटील व जेष्ठ नेते मा बळीराम(काका)साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघातील वडवळ, रामहिंगणी,विरवडे,मुंढेवाडी, पोफळी,कोळेगाव* या भागातील रेल्वेच्या अत्यारीत येणाऱ्या भूसंपादन प्रश्नांसंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात शुक्रवार दि २५ रोजी सोलापूर  येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.अजिंक्यराणा पाटील साहेब,सज्जन पाटीलसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार साहेब यांनी कार्यालयातून थेट संबंधित रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे संवाद साधत शेतकऱ्यांना योग्य मोबदला देत मदत करण्याची भूमिका मांडली.आणि रेल्वे खात्याने सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात रामहिंगणी आणि मुंढेवाडी या दोन गावांसाठी एक कोटी सदोतीस लाख पाच हजार सातशे तेहतीस रुपये (1,37,05,733) तात्काळ मंजूर केले. येत्या काळात लवकरच उर्वरित गावांसाठी ही निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन  उप जिल्हाधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी आमदार साहेबांना दिले आहे. 

मोहोळ मतदारसंघातील रेल्वे विभागाने केलेल्या भूसंपादन संदर्भात सोलापूर येथे उप जिल्हाधिकारी यांच्या शी चर्चा करताना आ.मा यशवंत(तात्या)माने साहेब व मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब*

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget