पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील एका विशिष्ट ठिकाणी ही गोरगरीब वंचित मुले राहतात या मुलांना आनंद देण्यासाठी आम्ही ठरवलं यांच्या मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करायचा,
मग यांच्यातील च एका लहान मुलाला हार घालवून सर्वांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करून त्याच्या आनंदात आपला आनंद सामावून घेण्याचं काम आज केलं
स्वतःचा वाढदिवस साजरा करणे केक कापणे हार घालून घेणे असं स्वतःचं कौतुक न करता एखाद्या गरीब मुलांची हाऊस पूर्ण करणे यात च खूप काही मनाला समाधान आज लाभलं
त्यांना मिळणारा आनंद व आपला वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे याचे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून ते आज दिसून आले यावेळी या मुलांना वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मुलांना एकत्र करून त्यांच्या हातामध्ये फुगे डोक्यावर बर्थडे ची टोपी घालून केक कापून त्यानंतर या सर्वांना चॉकलेट फरसान समोसे वडापाव देऊन स्वतःचा वाढदिवस व कौतुक न करता या लहान गोरगरीब मुलाचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या मनामध्ये यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या कडून करण्यात आला.
शिवश्री सोपान काका देशमुख व विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष विकी झेंड आमचे मित्र व पत्रकार श्री नवनाथ शिंदे सतीश डोंगरे विशाल वाघमारे व रोबिंहूड आर्मी टीम आदी उपस्थित होते,,,

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.