वृत्तसंस्था // प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, असं WHO कडून सांगण्यात आलं होतं. त्याच प्रमाणे अनेक व्यसायिकांना किंवा ऑफिसमध्येही याचा वापर करणे अनिवार्य केले होते.
लाॅकडाऊन असताना या नियामांचे सगळ्यांनी काटेकोर पालन केले मात्र अनलाॅक सुरु होताच अनेक दुकानांमधून किंवा ज्याठिकाणी अनेक लोकांची ये-जा असते अशा ठिकाणांवरुन मास्क आणि सॅनिटायझर गायब झाल्याचं चित्र बघायला मिळालं.
दुकाने, एटीएम, स्वच्छ धान्य दुकाने, पेट्रोल पंप, बँक, कृषी दुुकाने, फळविक्रेते, भाजी विक्रेते, रुग्णालये या ठिकाणी सॅनिटायझेशन केलं जात होतं. आलेल्या ग्राहकाला किंवा व्यक्तीला हवी ती खबरदारी घेत प्रवेश दिला जात होता.
मात्र आता हे बंद झालेलं दिसत आहे. एकिकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दर्शवली जात आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना नागरिकांच्या या वर्तणुकीमुळे कोरोनाचा उद्रेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.