दीड वर्षे उशिराने उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामाला आजपासून सुरुवात



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर स्मार्ट सिटीच्या वतीने सोलापूर ते उजनी अशी दुहेरी पाण्याचे पाईपलाईन टाकण्याच्या कामास आज पुणे रोड येथील डाळींब संशोधन केंद्र येथे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व महापौर श्रीकांचना यन्नम आणि मान्यवरांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आले. 

दुहेरी पाईपलाईनचे काम गेल्या दीड वर्षात पासून ही योजना प्रलंबित असून पाईपलाईनचा आज प्रत्यक्ष कामास सुरूवात होत आहे ही योजना दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावे. सोलापूर शहरासाठी ही योजना महत्वाचे असून सर्वांनी पक्ष बाजूला ठेऊन सर्वानी मिळुन हे दुहेरी पाईप लाइनचे काम पूर्ण करू
अशी अपेक्षा यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केली.

सोलापूर शहरासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेले सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आज पुणे रोड येथील डाळींब संशोधन केंद्र येथे करण्यात आले असून सोलापूर शहरातील हे प्रकल्प महत्त्वकांक्षी असून या मुळे सोलापूर शहरतील पाणी पुरवठा सुरळीत होऊन शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हे प्रकल्प सर्वांना सोबत घेऊन लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. 

यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, परिवहन सभापती जय साळुंखे, आयुक्त पी.शिवशंकर, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खैरादी तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढंगळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget