वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या एका 66 वर्षीय व्यक्तीला शिवसैनिकांची घरात घुसून चोप दिला. या प्रकरणाचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहे. या निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मुलीने मुंबईत माणुसकी मेली आहे, राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना पीडित कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांच्या मुलीने रात्री नेमके काय घडले याची माहिती दिली.
'रात्री 10 वाजेपासून वडिलांना फोन येण्यास सुरुवात झाली होती. फोन वरुन धमक्या दिल्या जात होत्या. तुम्ही जो फोटो शेअर केला आहे. त्यावर ते बोलत होते. माझ्या वडिलांनी तो मॅसेज फॉरवर्ड केलेला आहे. असं सांगितलं पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. त्यानंतर 12 वाजता लोकं घरी आली आणि त्यांनी वडिलांशी बोलायचं आहे म्हणून खाली बोलावलं, वडिल खाली गेले असता त्यांना लगेच मारहाण सुरू केली.' मनोज शर्मा यांची मुलगी शीला शर्माने हिने सांगितले.
तसंच, या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईत आता राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, इथं माणुसकी नावाची कोणतीही गोष्ट नाही.' अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.