शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे : रामदास आठवले




वृत्तसंस्था // प्रतिनिधी

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षाअंतर्गतच २ गट पडले होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी अध्यक्षपदाबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर यावर बऱ्याच चर्चा देशभरात रंगल्या होत्या. पण अखेर सोनिया गांधी याच काही काळ अध्यक्ष राहतील. असं या बैठकीत ठरलं. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.

'काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सुचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा.' असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.


'काँग्रेस हा देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता 100 खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही.' असा आरोप देखील त्यांनी केला आहे.


'राहुल गांधी ही काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी मूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपवावे अशी माझी सूचना असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विसर्जन करावे.' असं देखील आठवले यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget