तणाव दूर करण्यासाठी योग, प्राणायामचा अवलंब करा : पंतप्रधान मोदी



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

तणाव दूर करण्यासाठी युवा अधिकाऱ्यांनी योग आणि प्राणायामचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्याने सेवेत रुजू होत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना केले. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते. 


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी युवा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीच्या युवा पोलिस अधिकाऱ्यांशी आपण दरवर्षी प्रत्यक्ष संवाद साधतो. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे आभासी मार्गाने संवाद साधावा लागत असल्याचे मोदी म्हणाले. 


तणावात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरते. मनापासून तुम्ही कोणतेही काम केलात तर नक्कीच समाधान भेटते, अशा पध्दतीने काम केल्यामुळे तणावही येत नाही, असे मार्गदर्शन मोदी यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget