सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक एजुकेशन सोसायटी पुणे संचालित, फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला मधील विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०२० भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इनरव्हील क्लब सांगोला यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन भाषण स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळविले आहे.
या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटानुसार विद्यार्थ्यांनी भाग घेतला . इ १ली ते ४ थी या गटामध्ये फॅबटेक प्रशालेतील इ १ ली ची विद्यार्थींनी कु श्रुती सतिश कदम हिने “कोरोना आणि माझी जबाबदारी”या विषयावर अतिशय जागरूकपणे आपले विचार मांडून देशाचे भविष्य सुरक्षित नागरिकांच्या हाती आहॆ याची हमी दिली. कारण देशाचे भविष्य म्हणून आपण आजच्या पिढीकडे बघतो, अश्या या संकटाच्या काळात म्हणजे कोरोना सारख्या महाभयंकर अश्या संकटाला कसे जबाबदारीने सामोरे जावे त्या दृष्टीने एका सुशिक्षित नागरिकांची काय जबाबदारी आहे याविषयी या चिमुरडीने आपले विचार आपल्या भाषणातून प्रकट करून जीवनामध्ये कॊणत्याही मोठ्या संकटाला घाबरून न जाता निर्भीडपणे कसे तोंड द्यावे हे शिकविले व या स्पर्धेमध्ये तीने व्दितीय क्रमांक पटकाविला. तर इ ५ वी ते ७ वी या गटामध्ये फॅबटेक प्रशालेतील विद्यार्थीं शौर्य सचिन लिगाडे याने देखील “कोरोना आणि माझी जबाबदारी” या विषयावर अतिशय परखडपणे बालकांपासून-पालकांपर्यंत सर्वांनाच समजेल अश्या पद्धतीने आपले विचार मांडले व देशाबरोबरच आपल्या स्वतःची वैयक्तिक जबाबदारी काय आहे हे आपण कश्या पद्धतीने नियम पाळून आपल्या देशाला, कोरोना विरुद्ध स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कोरोना योध्यांना कशी मदत करावी हे अतिशय जागरुकपणे सांगून “मुर्ती लहान पण कीर्ती महान” या वूक्तीची आठवण करून दिली. व त्याने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी अशा लॉकडाऊनच्या काळात देखील आपल्या अंगभूत गुणांना विकसित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कठीण परिस्तिथीत ही यश संपादन केले जाऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले. त्यांच्या या यशामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या पालकांनी देखील त्यांची अतिशय सुंदररित्या या स्पर्धेसाठी खूप परिश्रम घेऊन तयारी करून घेतली . या स्पर्धेसाठी आवश्यक ती माहिती, स्पर्धेचे नियम व अटी याचे मार्गदर्शन शाळेतील क्रीडाशिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांनी केले.
यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थपकिय संचालक श्री भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. शाळेचे कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, संचालिका सौ सारिका रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, शाळेच्या प्राचार्या शिल्पा कोळेकर व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना हार्दिक शुभेच्या दिल्या .


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.