पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे येथील एका खाजगी दूध डेरी चालकाने एका गोरगरीब शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केली असल्याचे समोर येत असून हा चालक मागील काही वर्षापूर्वी सुद्धा एका कायदेशीर प्रकरणांमध्ये गुंतला होता.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की उंबरे येथील बापूराव मारुती मोहिते या गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांची गावातील आर्थिक फसवणूक केली आहे.
या डेरी चालकाने बापूराव मोहिते यांच्याकडून तीन लाख 25 हजार रुपयांचा धनादेश घेतला होता तो संबंधित शेतकरी बँकेत गेलेला नसतानासुद्धा त्या संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर चे रक्कम परस्पर विड्रॉल करून घेण्यात आली आहे.
याच गावातील या डेरी चालकाचे विरोधात मागील काही महिन्यापूर्वी एका गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशीच तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस सुद्धा या डेरी चालकाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आता ही दुसऱ्यांच्या वेळ असून असे अनेक प्रकार यावेळी चालकाकडून वारंवार घडत असलेली असल्याचे येथील स्थानिक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
तरिया डेरी चालकावर कारवाई व्हावी व या गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी त्यांनी सोलापूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून लवकरच सोलापूर येथील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे सुद्धा भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.