आषाढी वारी गेलीच...आताअधिक महिन्यात तरी व्यवसाय करू द्या!




समाजसेविका सौ.दुर्गाताई माने यांची गोरगरीब व्यवसायिकासाठी मागणी 

पंढरपूर // प्रतिनिधी

मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या या संकटामुळे सर्वच ठिकाणच्या मंदिरात प्रवेश बंद आहे. त्यामुळे कोणीही बाहेर कुठेही जात नव्हते, त्यामुळे सर्व दळणवळण आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. या कालावधीत पंढरपूर वासीयांचे जीवन अवलंबून असणारी आषाढी वारी पार पडली नाही. यामुळे येथील लोकं अडचणीत सापडले आहेत.तरी या सर्वच गोष्टीची भरपाई होण्यासाठी या आगामी अधिक महिन्यात तरी मंदिरे खुली करून जींवन जगु द्या अशी मागणी कोळ्यांची रणरागिणी समाजसेविका दुर्गाताई माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


कोरोना हा भयानक आहे. याची कल्पना आता सर्वांना झाली आहे. परंतु भूकबळी त्याहूनही वाईट आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींचा सारासार विचार करून योग्य ती नियमावली आखून लवकरच मंदिरे खुली करून कोलमडलेली अर्थव्यवस्था परत एकदा सुरू करावी अशी मागणी दुर्गाताई माने यांनी केली आहे.


    कोणत्याही गावातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे व्यवहार हे मंदिरावर आधारित असतात. त्यावरती विशेषतः महिला वर्ग यांचा व्यवसाय मोठा असतो. या महिलांनी बचतगट माध्यमातून मायक्रो फायनान्स आणि बॅंक कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेले असतात.या कोरोनाच्या परिस्थितीत व्यवसाय बुडाले आणि यामधील आर्थिक भांडवल शिल्लक राहिले नाही. त्यामुळे सध्या त्या महिलाना हप्ता भरणे कठीण झाले आहे.


 बचतगट हप्ते वसुल करणारे दारोदार चकरा मारू लागले आहेत, या कठीण संकटात शासनाने व्यवसाय सुरू होण्यासाठी मंदिरे खुली करावीत .तसेच लोकडाऊन काळात जी आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. त्यांना छोटे भांडवल पुरविण्यासाठी उपाययोजना करावी अशी  मागणीही समाजसेविका दुर्गाताई माने यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget