ट्विट करत कंगना रनौतनं दिलं ओपन चॅलेंज
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच “देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत” केल्यामुळे आता कंगणावर सोशल मीडियावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, यानंतर आता कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली कि, “मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या 9 सप्टेंबर रोजी येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा”. असं खुल आव्हान कंगनानं यावेळी दिलं आहे. सध्या कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.
अनेक हिंदी- मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहे. ‘ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस? अशा शब्दांत कंगनावर टीका होऊ लागल्या आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.