वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच कंगना व शिवसेना वादावर अप्रत्यक्षपणे बाण चालवला. कुणाचेही नाव न घेता, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात आपली बाजू मांडत, राजकारण सांगितलं.
'महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय', मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं. सध्या विषय कोरोनाचा आहे, त्यामुळे कोरोना व त्यावरील उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. माझे कुटुंब-माझी जबाबदारी याचं पालन करण्याचंही उद्धव ठाकरेंनी केलं.
'तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो' असं मी यापूर्वी म्हटलं आहे. पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, सरपंचांपासून ते नगरसेवक, आमदार-खासदारांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, विभागवार कार्यक्रमाची आखणी करावी, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
कुटुंबातील 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.