महाराष्ट्रा मधून महा क्षेत्र आळंदी देवाची व महा क्षेत्र देहू इथून दरवर्षी माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात किमान पंधरा लाख वारकरी असतात आणि वारकरी रस्त्याने जात असताना रस्त्याने अपघात होऊ नये व वारकऱ्यांच्या विसाव्याच्या आणि अनेक प्रकारच्या अडचणी लक्षात घेऊन महामार्ग भक्तीचा असा चार पदरी रस्ता तयार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व या रस्त्याच्या करीता केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब, माननीय श्री शरद पवार साहेब , मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजित (दादा) पवार साहेब यांच्या पुढाकारातून होत असणाऱ्या या पवित्र आणि स्तुत्य कार्याकरिता सर्व वारकऱ्यांन तर्फे अभिनंदन करतो व कौतुक करतो पण ज्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीसोबत लाखो वारकरी पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे विदर्भातून लाखो वारकरी आषाढी वारीला महा क्षेत्र पंढरपूरला पायी जातात प्रामुख्याने महा क्षेत्र कौंडण्यपूर रुक्मिणी माता, समर्थ सद्गुरु गजानन महाराज शेगाव, प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज माधान, श्री संत वासुदेव महाराज अकोट, श्री संत भास्कर महाराज अकोली जहागीर, श्री संत भोजने महाराज अटाळी, श्री संत सखाराम महाराज इलोरा, श्री संत सोनाजी महाराज सोनाळा, श्री संत शिवराम महाराज वरुड जवळका, श्री संत पाटकर महाराज टाकळी, संत नरसिंग महाराज अकोट,श्री संत वाल्मीक महर्षी सामदा, श्री संत अमृत महाराज नरखेड, श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव, श्रीक्षेत्र जवळा , भवसागर चारीटेबल ट्रस्ट नाना उजवणे अकोला , सिद्धेश्वर गुलाब बाबा संस्थान काटेल धाम अशा विदर्भा मधून बऱ्याच पालख्या शेकडो वर्षापासून निष्ठेने महा क्षेत्र पंढरपूरला पायदळ जात असतात आणि या पालखी सोहळ्याचा प्रामुख्याने मार्ग नागपूर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम या पालख्या जवळजवळ हिंगोली, औंढा ,परळी ,आंबेजोगाई, परभणी, भगवान बार्शी मार्गे पंढरपूर जातात आणि या रस्त्याने वारकरी करिता कोठेही विसाव्याची व्यवस्था नाही, बऱ्याच ठिकाणी पिण्याचे पाणी सुद्धा वारकऱ्यांच्या करिता उपलब्ध होत नाही, बऱ्याच ठिकाणच्या रस्त्याचे कामे कितीतरी वर्षांची रखडलेली आहेत पुलांची कामे अर्धवट आहेत रस्त्याने झाडांची कटाई केलेली आहे विदर्भातून जात असणाऱ्या पालखी सोहळा ला अशा बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते. केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा राया आणि जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळा करीता आपण व्यवस्था करीत आहात त्याप्रमाणे विदर्भातून जाणाऱ्या पालखी सोहळ्या करिता रस्त्याने वारकऱ्यांना करिता एका बाजूने नियोजित वाटकरुन द्यावी, विदर्भ पालखी सोहळा करीता विसाव्या ची व्यवस्था करावी, त्या रस्त्याला सुद्धा रुक्मिणी माता महामार्ग असे नाव देण्यात यावे, रस्त्याच्या कडेला वारकऱ्यांच्या विश्रांती करिता विश्राम गृह निर्माण करावे, पालखी सोबत पंढरपूर पर्यंत पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावेत व पालखीसोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर इत्यादी व्यवस्था देण्यात यावी ही नम्र विनंती
केंद्र सरकार पुरस्कृत पालखी मार्ग करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे पण विदर्भालाही यात सहभागी करायला पाहिजे.
विदर्भातून सुमारे ४०० ते ६०० पालख्या पंढरपुरला जातात. अशाप्रकारे विदर्भातील पाच लाख वारकरी सहभागी होतात परंतु ज्याप्रकारे माऊलींच्या पालखीला संरक्षण मिळते त्याच प्रकारे विदर्भाच्या रुक्मिणी मातेच्या पालखीला मिळत नाही हेच कारण आहे की;चार वर्षांपूर्वी पंढरपूरजवळ कोंढाण्यपुरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीमध्ये चार चाकी वाहन घुसल्याने मोठा अपघात झाला होता. तसेच सात ते आठ वर्षापूर्वी शेगावच्या पालखीमध्ये कंटेनर घुसल्यानंतर झालेल्या अपघातात 16 ते 17 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. विदर्भाच्या पालखीला संरक्षण देण्याबरोबरच मेगा प्रकल्पात जागा दिली पाहिजे कारण कौंढाण्यपुर व शेगावच्या पालखीला विशेष महत्व आहे
-:गणेश महाराज शेटे
युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.