शिवसेनेला आणखी एक धक्का! महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड 19 च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. सभागृहाची बैठक तातडीनं बोलवावी असून यासाठी भाजपचं महापौरांना पत्र लिहिलं आहे. मुंबईत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. या भ्रष्टाचारावरुन भाजप महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे.


कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.


दुसरीकडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या (Kangana Ranaut) वांद्रेतील पाली हिल मार्गावर असलेल्या बंगल्याचे बेकायदेशीर बांधकाम बुधवारी पाडलं. मुंबई हायकोर्टाच्या स्थगितीआधीच बीएमसीनं कंगनाच्या घराचं अतिक्रमण पाडलं. त्यावर आज सुनावणी होणार आहे.


मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं 'मणिकर्णिका' फिल्म्स कार्यालयाचे बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर, जेसीबी व हातोड्याचा वापर केला. या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने कारवाईला स्थगिती दिली खरी, परंतु तोवर बरेच बांधकाम पाडण्यात आले होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget