पंढरपूर तालुक्यातील पूरग्रस्तांना तातडीने निधी मिळावा यासाठी पुकारलेले आंदोलन प्रांत अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित



पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये गेल्यावर्षी आलेल्या  महापुरात अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांची मोठी नुकसान झाले होते महाराष्ट्र राज्य शासनाने या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले परंतु तलाठी सर्कल यांनी पंचनामा करताना दुजाभाव करून अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागले होते हे शेतकरी प्रशासकीय कार्यालयाकडे अनेक वेळा हेलपाटे मारत होते परंतु या शेतकऱ्यांची अधिकारी दखल घेत नव्हते परिणामी या शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आपल्या अडचणी सांगितल्या या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर व जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी येथील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन 21 सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथील टॉवरवर चढून उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली पंढरपूर तालुक्यातील वंचित पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी तात्काळ पूरग्रस्त गावांचा आढावा घेऊन वंचित पूरग्रस्तांना पुराचे अनुदान मिळण्यासाठी तहसील कार्यालय कडून तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांचे जवळपास एक कोटी 44 लाख रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली असल्याचे लेखी पत्र बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार विजय जमादार एस पी ती तिटकरे प्रवीण शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर गोपाळ पाटील अनिल जवळेकर मारुती कोळशे समाधान उपासे विजय कोळसे समीर आत्तर सुरज भांगे ऋषिकेश चिंचकर नागनाथ जवळेकर भैय्या नाईक नवरे सिताराम कोळसे बळीराजा संघटनेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget