तर आंदोलन अधिक तीव्र करणार. - भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे यांचा इशारा.
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मोहोळ नगर परिषदेकडे हंगामी कामगार म्हणून काम करीत असलेल्या कामगारांचे अर्थीक नुकसान करुन त्यांचे शारीरिक, मानसिक शोषण करणाऱ्या मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व इतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कामगाराच्या सर्व न्याय्य हक्काच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अन्यथा कामगारांच्या प्रश्नावरील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टी चे मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे व संजीव खिलारे यांनी दिला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना आरोग्य संरक्षण किट देण्यात आले नाही, मोहोळ न.प.ने कामगारांचा गेल्या चार महिन्यांपासून पगार अदा केला नाही, न.प. स्थापनेपासून पीएफ रक्कम कपात करुनही कामगारांचे खात्यावर भरली नाही, या व इतर न्याय्य हक्कांच्या मागण्यांबाबत भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे व संजीव खिलारे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ न.प.च्या कामगारांनी न.प.समोर दि.०३ सप्टेंबर पासून "बेमुदत कामबंद व ठिय्या आंदोलन" आरंभले असून आज दि.०५/०९/२०२० रोजी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.
मोहोळ नगरपरिषद स्थापने पुर्वी पासुन हंगामी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करुन घेण्यात आले नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने कामगारांना आरोग्य किट दिले नाही. कामगारांचा आरोग्य संरक्षण विमा उतरविला नाही. न.प.स्थापने पासून पी.एफ.ची रक्कम कामगारांच्या पगारीतून कपात करून देखील ती त्यांच्या खात्यावर भरली नाही. प्रती कामगारांचे नावे ५२७ रुपयाने वेतन काढले जाते परंतू कामगारांना मात्र २७० रुपयाने पगार दिला जातो, तरी कामगारांना किमान वेतन पध्दतीने वेतन अदा करण्यात यावे. न.प. कडे कररुपाने जमा असलेली रक्कम विकास कामांवर टी.एस. सदरी भरली व उर्वरीत जमा रक्कम इतरत्र खर्च केली परंतू कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. कामगारांनी सबब प्रकरणी नगरपरिषदेला व वरिष्ठांना अनेक वेळा विनंति अर्ज दिले, आंदोलने केली तरीही यावर संमंधीतांनी कोणीतीच कार्लीयवाही केली नाही. या संपूर्ण प्रकरणात न.प. चे मुख्याधिकारी पूर्णपणे जबाबदार असून त्यांनी कामगारांचे एक प्रकारे अर्थीक, माणसिक, शारीरिक शोषण सुरु केले असून या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यावर व इतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांची असून या प्रकरणी नगरपरिषद प्रशासन व वरिष्ठांकडून योग्य ती दखल घेवून कामगारांना योग्य तो न्याय दिला नाही तर आमचे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा भाजपा मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे व संजीव खिलारे यांनी दिला आहे. मोहोळ न.प.च्या हंगामी कामगारांच्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आमचे आंदोलन बेमुदत चालू ठेवणार असल्याचे सतीश काळे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात मसा अष्टूळ, बालाजी काटकर, महेश भोसले, तानाजी कसबे, शंकर अष्टूळ, करण अष्टूळ, शरद कसबे, विकास अष्टूळ, गणेश अष्टूळ, पुष्पा कांबळे, कावेरा अष्टूळ, प्रभावती माळी, रुक्मिण क्षिरसागर, मैना अष्टूळ, डुमा खिलारे इत्यादी शेकडो कामगार या आंदोलनात सहभागी आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.