(कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण)
सोलापूर // प्रतिनिधी
राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने 516.30 कोटी रू. शासन हमी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांचा समावेश असून जिल्ह्यातील या सहा कारखान्यांना 120 कोटी ₹ हमी देण्यात आली आहे. यामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर ता.मोहोळ 20.22 कोटी रूपये थकहमी मंजूर झाली असून शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक अडचणींना सामोरे जात भीमा सह. साखर कारखान्यास थकहमी मंजूर झाले आहे बदलत्या निसर्गाच्या वातावरणामुळे व त्याच कर्जाचे थकलेले हप्ते या आर्थिक कचाट्यात सापडला होता. अशा प्रकारे देशातील व राज्यातील साखर उद्योग मोठ्या अडचणीत सापडला त्यात कोरोना महामारीचे संकट यात तर साखर उद्योग पुरतः डबघाईला आला यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे ता. पंढरपूर 30.96 कोटी रूपये, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा 10.58 कोटी रुपये, सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना अकलूज 33.24 कोटी रुपये , श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना पडसाळी ता. माढा 5.15 कोटी रुपये , सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना भाळवणी ता. पंढरपूर 14. 52 कोटी रूपये या व अशा अनेक साखर कारखान्यांचा समावेश आहे. 2020- 21 च्या गळीत हंगामात हे कारखाने आता सुरू होवू शकतात.
15 ऑक्टोबर रोजी गळीत हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी शासनाने थकहामी दिली आहे. यामुळे कारखाने सुरू करण्यास आता अडचण नाही. थकहामी दिलेल्या कारखान्यांन पैकी भाजपा नेत्यांचेही काही कारखाने असून त्यांनी ही राज्य सरकारने सर्वतोपरी मदत केली आहे.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.