आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल. उज्वला गॅस योजनेची जोडणी आता सशुल्क राहील तर दूरचित्रवाणी संच महागण्याची शक्यता आहे. आजपासून लागू होणाऱ्या या बदललेल्या नियमांनुसार परदेशात पाठवायच्या रकमेवर कर भरावा लागेल. तर सुट्या मिठायांवरही एक्सपायरी डेट नमूद करावी लागेल.    

मोटारीत मोबाईल, पण                     

वाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही. ही कागदपत्रे केंद्राच्या डिजीलॉकर किंवा एम परिवर्तन सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेऊन ती ऑनलाईन कॉपी वाहन चालवताना बाळगली तरीही चालेल. सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही. मात्र आता रस्ते शोधण्यासाठी मोबाईल वापरता येतील, अर्थात त्यामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात केंद्राने वाहन कायद्यात बदल केले आहेत.      प्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस सिलेंडरची जोडणी घेण्यासाठी आता निर्धारित शुल्क भरावे लागेल. एवढे दिवस ही योजना निःशुल्क होती, मात्र आता निःशुल्क योजनेची मुदत संपत आहे. परदेशी टूरपॅकेज खरेदी करण्यासाठी वा अन्य कारणांसाठी परदेशात पाठवलेल्या सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ती पाठवतानाच आयकर भरावा लागेल. टूर पॅकेजसाठी पाच टक्के कर लागेल तर अन्य रकमेसाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रकमेवरच कर भरावा लागेल.  

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget