राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात जिल्हा युवक काँग्रेसचे आंदोलन

 


पंढरपूर // प्रतिनिधी 

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचे आज पंढरपुरात ही तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन करण्यात आले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. 


उत्तर प्रदेशातील  हाथरसला आज राहूल गांधी  पायी निघाले होते. दरम्यान  उत्तर प्रदेश पोलिसांनी  काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना  धक्काबुक्की करण्यात आली.

या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे.

योगी सरकारच्या या दडपशाही कृत्याचा निषेध करत जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नगरपालिके समोर आंदोलन केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रवादी यांचा पुतळा जाळून निषेध केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी ही केली.यावेळी उपाध्यक्ष संदीप शिंदे सोमनाथ आरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget