मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संताप



सोलापूर // प्रतिनिधी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पूरग्रस्त नुकसानीचा पाहणी दौरा सुरुवातीला वादात पडला आहे. स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये या भेटीचा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांनाच पूल पार करुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोलावले आहे. त्यावरुन, हा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी गावात यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.  सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले जात आहे. स्थानीक शासकीय अधिकारी ग्रामस्थांना पुलावर या असे सांगत आहेत. पण, ग्रामस्थ तयार नाहीत. ते म्हणत आहेत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमात सांगवी खुर्द येथून सुरूवात ठरवण्यात आले आहेत. शासकीय अधिकारी आता ऐन वेळी कार्यक्रम बदलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीच्या पुलावरून आमची पडझड झालेली घरे आणि नुकसान कसे दिसणार ? हा ग्रामस्थांचा मुद्दा आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी पुलावरुन गावात यावे, असे तेथील सरपंचांनी लोकमतशी बोलताना म्हटलंय. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget