माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत उद्या पंढरपूर नपातर्फे भव्य सायकल रॅलीचे आयोजन.




पंढरपूर // प्रतिनिधी 

माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियाना अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने  पंढरी नगरीतील सर्व सायकलप्रेमींसाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथून मा आमदार ,मा  नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, प्रांतसाहेब, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, सर्व सभापती व नगरसेवक यांचे हस्ते झेंडा दाखवून होईल व श्रीयश पॅलेस येथे सर्टिफिकेट देऊन समारोप होईल तरी सर्व सायकल प्रेमी नागरिकांनी या रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली कुटुंबाविषयी असणारी जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. या रैली मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना T-Shirt व Certificate देण्यात येणार आहेत. कृपया जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आशिया वाहन पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्यांधिकारी सुनील वाळुजकर साहेब यांनी सर्वांना केले आहे.

स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर

वेळ- सकाळी ७ वाजता

सर्व सायकलस्वार  यांनी सकाळी 6।30 वाजता टिळक स्मारक पटांगण येथे उपस्थित राहावे या ठिकाणी च आपल्याला टी शर्ट दिले जातील

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget