सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा:- आमदार प्रशांत परिचारक





पंढरपूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपूर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 190 मिली मीटर पर्यंत पावसाची नोंद झालेली होती.

यामध्ये नदीकाठची हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, शेताच्या जमिनी खालच्या, चारा व धान्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने, घरांचे नुकसान झाले त्यामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व नागरिकांना थेट मदत देण्यात यावी.

अशी मागणी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.


सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची द्राक्ष, ऊस, डाळिंब, केळी, कांदा आदी पिकांना या पावसाच्या व पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसानास सामोरे जावे लागले. या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले. 


पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या नागरिकांच्या घरात, वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानाची, जीवनावश्यक वस्तूंची, घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांची घरे चिखलमय झाली. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.


वरील सर्व बाबींचा विचार करता आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार पंढरपूर येथे शनिवारी दि. 17 ऑक्टोंबर 2020 आले असता त्यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे की, सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून लवकरात लवकर नागरिकांना, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget